नाशिक शहरात जोरदार पाऊस
नाशिक पाऊसfile photo

नाशिक शहरात जोरदार पाऊस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. (heavy rain in Nashik) गेल्या दोन आठवड्यापासून नाशिकमध्ये वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे. कधी तपमान १२ अंशांपर्यंत खाली येते तर कधी हेच तपमान अचानक ७-८ अंशांची घट होऊन वाढतेही यामुळे आगामी रब्बी हंगामावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

नाशिकमध्ये थंडीचा कडाका पुढील आठवड्यात जाणवेल अशी माहिती हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर (Shrinivas Aundhkar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले की, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरनंतरच थंडीचा कडाका वाढेल.

सध्या दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. त्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पाऊस होईल.

हवामान अभ्यासक औंधकर यांच्या अंदाजानुसार सायंकाळी नाशकात मुसळधार जलधारा कोसळल्या. दरम्यान, दिवसभर तपमान वाढलेले होते. दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री अचानक पावसाने मुसळधार हजेरी दिल्यामुळे वातावरणात गारठा वाढला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com