नांदगावमध्ये पावसाचा हाहाकार; रेल्वे सेवा ठप्प, अनेक घरांत शिरले पाणी

नांदगावमध्ये पावसाचा हाहाकार; रेल्वे सेवा ठप्प, अनेक घरांत शिरले पाणी

नांदगाव | प्रतिनिधी Nashik

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यासह (Nandgaon) शहरात ढगफुटीसारखा पाऊस रात्री झाला. (Heavy rain in Nandgaon) अचानक आलेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचले होते. (Nandgaon Railway Station) यामुळे काही काळ इथली वाहतूक खोळंबली होती...

दुसरीकडे शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरले. हातावर काम करणाऱ्या रहिवाश्यांचा संसार पाण्याखाली गेला. नांदगावसह जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon), मनमाड (Manmad), नांदगाव (Nandgaon), येवला (Yeola), सटाणा (Satana) भागात पावसाने धुमाकूळ घातला. काल (दि ०७) दुपारपासून पावसाला सुरूवात झाली होती.

त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. जोरदार पावसामुळे अनेक नदी नाल्याना पूर येऊन ते दुथडी भरून वाहत आहेत. नांदगाव शहरातून वाहणारी शकांबरी (Shakambari River) आणि लेंडी नदीला (Lendi River) पूर येऊन त्याचे पाणी नदी काठी असलेली बाजारपेठ, दुकाने, घरात पाणी शिरले.

तर वखारी (Wakhari) आणि दरेल (Darel) येथे छोटे बंधारे फुटल्यामुळे त्याचे पाणी अनेक शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com