राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई | Mumbai

मागील दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या (Maharashtra Rain) घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु असून आज (दि.१५) रोजी उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे...

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

तसेच बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी विजांसह (lightning) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com