द्राक्षबागांत गुडघाभर पाणी; भाजीपाल्यासह खरिपाची नासाडी

ओझे |वार्ताहर Ojhe

दिंडोरी तालुक्यात आज सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. (Heavy rain in dindori taluka) मात्र, शुक्रवारी कादवा कारखाना (Kadava Shugar Factory) वरखेडा, मातेरेवाडी, जोपुळ, लोखंडेवाडी परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला....

यावेळी सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. येथील चिखली नाल्याला मोठा पूर आल्याने शेत पाण्याखाली गेले. आज दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. द्राक्ष बागा भाजीपाला पिकातून पाणी वाहू लागले.

नुकत्याच छाटणी झालेल्या द्राक्षबागांना या पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. तर टोमॅटो सह विविध भाजीपाल्याचे नुकसान झाले. काढणीस आलेल्या सोयाबीन भुईमुगाचे नुकसान झाले आहे.

दिंडोरी वलखेड, पालखेड कोराटे लखमापूर, खेडगाव जानोरी मोहाडी आदी गावांनाही जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, पालखेड बंधारा पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सायंकाळी पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कादवा नदीला पूर आल्याने नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com