दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात दुपार पासूनच पावसाने सुरुवात केल्यांमुळे द्राक्षबागासह खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रात्री उशिरा पर्यत तालुक्यात पाऊस चालू असल्यामुळे शेतकरी वर्गा मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

आज दुपारी शिंदवड, खेडगाव कादवा कारखाना, लखमापूर, ओझे, म्हैळूस्के, करंजवण, खेडले, वणी, तळेगावसह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरादार हजरी लावली त्यांमुळे या परिसरातील द्राक्षबागा मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यांमुळे फवारणीसाठी टॅक्टर चालवणे मुश्किल झाले आहे.

पाऊस पडल्या नंतर त्वरित पावडर हि मारावीच लागते. त्यांमुळे द्राक्षबागेला पावडर कशी मारायची असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.

दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्षबागाच्या छाटणीचे काम अंतिम टप्यात असून पाऊसामुळे छाटणीसह द्राक्षबागेच्या इतर कामाना अडथळा निर्माण झाला आहे.

सतत पडणा-यां पावसामुळे द्राक्षबागेत घड जिरण्याचे प्रमाण वाढत असून पोंगा अवस्थेत असणा-या बागाना डावण्या रोगाची जास्त भिती असते या पाऊस पडल्यामुळे द्राक्षबागेसह इतर भाजीपाला पिकांच्या फवारणीचा खर्चही वाढत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *