दिंडोरी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

File Photo
File Photo

ओझे l वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) गेल्या तीन दिवसापासून वातावरण बदल (Climate change) होऊन ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार होऊन आज सलग दुसऱ्या दिवशी सांयकाळी तालुकयात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस (rain) पडला असून या पावसामुळे द्राक्षबागाचे नुकसान (Damage to the vineyard) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात काल काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला तर आज सांयकाळी दिंडोरी तालुक्याच्या (dindori taluka) अनेक भागामध्ये जोरदार पाऊस (heavy rain) झाला असून या पावसामुळे गहू, हरबरा, पिकांची पेरणी लांबण्याची शक्यता आहे तर उशिरा छाटलेल्या द्राक्षबागाना धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे द्राक्षबागामध्ये फुलॉरो अवस्थेत असणा-या बागामध्ये मणीगळ, घडकुज, तसेच डावणी, भुरी रोगाची लागण होऊन फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

तर लवकर छाटणी झालेल्या द्राक्षबागाना कॅक्रिंगचा धोका निर्माण झाला आहे त्यांमुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच प्रमाणे कांदा रोपाचे (onion crop) नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पेरणी झालेला गहू पिकामध्ये पाणी साचलेल्यामुळे नुकसान होणार असून गहू पिकावर मावा पडण्याची शक्यता आहे.

या बेमोसमी पावसामुळे प्रत्येक वर्षी शेतकरी (farmers) हैराण झाला असून बळीराजापुढे संकट उभे राहत आहे आधीच परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाल्यामुळे हैराण झाला आहे त्यात पुन्हा बेमोसमी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी निसर्गापुढे हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com