Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात संततधार

गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात संततधार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात गेल्या काही दिवसापांसुन कमी अधिक पाऊस सुरू असुन याभागातील धरणात पुरेसा जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे…

- Advertisement -

यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर समुह धरणातील जलसाठा 64 टक्क्यावरुन 72 टक्के झाला आहे. तर एकट्या गंगापूर धरणातील साठा 94 टक्क्याच्या वर गेल्यामुळे या धरणात विसर्ग सुरू झाला असुन सलग दुसर्‍या दिवशी 1040 क्युसेस विसर्ग सुरु होता.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर व दारणा समुह धरणातून दररोज सुमारे 18.5 दश लक्ष घन फुट इतका पाणी पुरवठा केला जातो. यात शहराच्या 70 ते 80 टक्के भागाला गंगापूर समुह (गंगापूर, गौतमी व कश्यपी)धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

या धरण समुहात आज (दि.24) सकाळी 6 वाजेपपर्यत 71.91 टक्के (7577 दश लक्ष घन फुट) इतका जलसाठा नोंदविला गेला आहे.

मागील वर्षी 24 ऑगस्ट रोजी 99 टक्के इतका जलसाठा नोंदविला गेला होता. यावरुन यंदा धरण पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत पुरेशा पाऊस झालेला नव्हता.

यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुका पश्चिम भागात कमी अधिक पाऊस सुरू झाला असुन याचा चांगला परिणाम आता दिसु लागला आहे. यामुळे गंगापूर धरणातील जलसाठा 94.21 टक्के इतका साठा झाला आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने आता आजपासुन या धरणातून विसर्ग सुरू केला आहे.

असे असले तरी गंगापूरच्या वरच्या भागात असलेल्या समुहातील गौतमी धरणात अजुनही 65.98 टक्के व कश्यपीत 55.56 टक्के इतका साठा आहे. यामुळे गंगापूर समुह धरणाचा एकुण जलसाठा 71.91 टक्केच आहे. समुहाचा धरण साठा अद्याप पुरेशा प्रमाणात झालेला नाही. यामुळे अजुनही पाऊसाची गरज आहे.

मात्र, नाशिक महापालिकेकडुन ऑगस्ट अखेर पाणी कपातीसंदर्भात निर्णय घेण्याचे जाहीर केले असले तरी आता पडत असलेल्या पाऊसामुळे कपातीची टांगती तलवार दूर होणार असल्याचे चित्र आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ; आजची स्थिती

धरण उपयुक्त साठा आजचा साठा टक्केवारी

गंगापूर 5630 5304 (द.ल.घ.फु.) 94.21

कश्यपी 1852 992 53.56

गौतमी 1868 1197 64.05

एकुण 7493 70.60

- Advertisment -

ताज्या बातम्या