Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मान्सूनचा ( Mansoon) जोर अधिक उत्तरेकडे न सरकता त्याच्या मूळ सरासरीच्या जागेवरच खिळलेला राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मान्सून शनिवार दि.२३ पासून पुन्हा दक्षिणेकडे सरकण्याच्या शक्यते मुळे महाराष्ट्रात मुंबईसह कोकण, गोवा व विदर्भ वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात उद्या शनिवार दि.२३ पासुन त्यापुढील ३ दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता (Chance of moderate to heavy rain) जाणवते,असे पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule, a retired meteorologist) यांनी सांगितले.

- Advertisement -

विशेषतः नाशिक इगतपुरी,त्र्यंबकेश्वर, पेठ दिंडोरी, सटाणा,कळवण,पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार,मोखाडा,नवापूर, नंदुरबार, शहादा तळोदे अक्राणी ,अक्कलकुवा, शिरपूर,चोपडा ,रावेर ,यावल, एडलाबाद, जामोद या तालुक्यात तर मराठवाड्यातील जालना ,हिंगोली, नांदेड जिल्ह्यात रविवार, सोमवार (२४-२५) रोजी अधिक जोरदार पावसाची शक्यता जाणवते.मुंबईसह कोकणातील ४, गोवा व विदर्भातील १० जिल्ह्यात मात्र पुढील काही दिवस अति जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.

याचाच अर्थ काहीश्या उघडीपीनंतर शनिवारपासुन पाऊस पुन्हा काहीसा सक्रिय होण्याची शक्यता जाणवते,असेही खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या