नाशकात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार

नाशिक पाऊस
नाशिक पाऊस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहराला काल (दि ०४) पावसाने (Rain) चांगलेच झोडपले. तीन तासाच्या पावसात सर्वत्र चिनभिन झाली होती. तब्बल ५७ मिमी पाऊस सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत पडला...

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. आज सलग दुसऱ्या दिवशी नाशकात (Nashik) पावसाने बरोबर चारच्या सुमारास जोरदार हजरी लावली.

आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. तसेच वातावरणात आद्रता वाढल्यामुळे अंगाचा घाम निघाला होता.

अशातच चारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि धोधो पावसाला सुरुवात झाली. ८३ टक्क्यांवर जिल्ह्यातील धरणांचा साठा वाढल्यास लवकरच जिल्ह्यातील धरणातून पाण्याच्या विसर्गास (Water Discharged) सुरुवात होणार आहे.

नाशिक पाऊस
गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

गेल्या महिन्यात विक्रमी पाऊस बरसल्यानंतर गेल्या २८ जुलैपासून पावसाने उघडीप दिली होती. तापमानही ३० अंश सेल्सीअस पर्यंत गेले होते. त्यानंतर काल (दि ०४) पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे वातावरणात गारठा जाणवत होता.

नाशिक पाऊस
अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; 'पाहा' थक्क करणारा व्हिडीओ...

रविवार कारंजा (Ravivar Karanja), कॉलेज रोड (College Road), शालीमार (Shalimar) या परिसरात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ झाली. कोणी रेनकोट घालत तर कोणी छत्री उघडून पावसापासून बचाव करताना दिसून आले. अनेकांनी यावेळी कडक चहा आणि भजींचा आस्वाद घेतला.

नाशिक पाऊस
Video : ...तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जोरदार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. यामुळे दुचाकी धारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

नाशिक पाऊस
Video : सांगा आमचं काय चुकलं?; शाळा बंद, चिमुकल्यांची १५ किमीची पायपीट

रस्त्यांची चाळण झाल्यामुळे दिवसा धुळीचा सामना तर पावसात न दिसणाऱ्या खड्यांचा सामना यामुळे दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ हे खड्डे बुजवावेत अशी मागणी आता जोर धरत आहे.

नाशिक पाऊस
उद्धव ठाकरे पुन्हा सामनाचे मुख्य संपादक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com