देशातील 'या' भागात पाऊस कोसळणार

पाऊस
पाऊसRain

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दक्षिण भारतातील (South India) अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील ३ दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे...

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू आणि केरळच्या (Tamil Nadu and Kerala) किनारी भागातमुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय कर्नाटक, रायलसीमा, कोस्टल आंध्रप्रदेश, लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण आंध्रप्रदेश-तामिळनाडू-पुडुचेरी, लक्षद्वीप आणि कोमोरिन भागात ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

दरम्यान, येत्या ४८ तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी (snowfall) आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याशिवाय बदलत्या हवामानामुळे या राज्यांमध्ये तापमानात घट होणार असून थंडी (Cold) आणखी वाढू शकते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com