येवल्यात पावसाचा हाहाकार, अनेक घरांमध्ये शिरले पाणी; पाहा व्हिडीओ...

येवला | प्रतिनिधी | Yeola

काल रात्रीच्या सुमारास येवला शहरासह परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याने शहरातील स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी अमरधाममध्ये व तेथील घरामध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे...

रात्री अमरधाम येथील घरात पाणी शिरल्याने आपला जीव वाचवा की संसार असा प्रश्न या कुटुंबाला पडला होता.लहान बाळ देखील हातात घेऊन त्यांना रात्र पाण्यात काढण्याची वेळ आली होती.शहराच्या अमरधाम पासून जाणारा आहे या नाल्याची पुढे स्वच्छता न झाल्याने तुंबू बसल्याने पाणी सर्व स्मशानभूमीत शिरले आहे. तसेच बस स्थानक परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने बस आगारातून बस काढण्यास कसरत करण्याची वेळ येत आहे.

हुडको वसाहतीतील घरांमध्मये पाणीच पाणी...

पावसाने येवला शहरात धुमाकूळ घातला असून शनि पटांगण ,इंद्रनील कॉर्नर भागातील अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते तर शहरातील लक्कडकोट, हुडको भागातील अनेक रहिवासी घरांमध्ये पाणी शिरल्याने अक्षरशा संसार हा भिजला गेला आहे. तरी नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा संताप हुडको भागातील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

हुडको वसाहत जवळून जाणाऱ्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने नेहमीच येथे घरात पाणी शिरत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून संबंधित प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी नागरिकांनी दिली आहे. दिवाळी सणा निमित्त मोठ्या प्रमाणात सामान भरले असून हे सर्व सामान भिजले गेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com