Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : सिन्नर तालुक्यात पावसाचा कहर; शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

Video : सिन्नर तालुक्यात पावसाचा कहर; शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील पाथरे शिवारात काल मध्यरात्रीच्या सुमारास परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले. ढगफुटी सदृश्य पावसाने परिसरातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्याच्या (Sinnar Taluka) विविध भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. ठाणगाव, डुबेरे ,सोनारी, कोनांबे, दापूर, नांदूर शिंगोटे, गुळवंच आदी परिसरात पावसाचा कहर बघायला मिळाला. या सर्व गावांमधील आजही हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या पिकांच्या काढणीला वेग आला असून सोयाबीन, मका, बाजरी या सर्व पिकांची सोंगणी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची गंजी शेतात लावून ठेवली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनची सोंगणी चालू असल्याने माल शेतात पडून आहे. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली धांदल उडाली. शेता साठवून ठेवलेले माल तसेच काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच साळवे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य पावसाने अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. परिसरातील अनेक रस्त्यांना नद्याचे रूप प्राप्त झाले होते. यामुळे दळणवळणाचाही मोठा प्रश्न उद्भवला आहे.

परिसरातील शेकडो हेक्टर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कांद्याची रोपे, टमाटर, फ्लावर, कोबी या पिकांना अधिक फटका बसला असून प्रत्येक शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेत परिसरातील शेतमालाचा व रस्त्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या