Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पुन्हा मुसळधार; 'या' भागात पुढील सात दिवस जोरदार पाऊस

नाशकात पुन्हा मुसळधार; ‘या’ भागात पुढील सात दिवस जोरदार पाऊस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात गुरुवारी मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसला. शुक्रवारीदेखील पावसाने हजेरी लावली. काल (दि. ६) पावसाने विश्रांती घेतली मात्र एक दिवसाच्या विश्रांतीनंतर नाशिकला पुन्हा जोरदार पावसाने झोडपले….

- Advertisement -

सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली होती. दुपारी सुमारे अर्धा तास पाऊस सुरु होता. मात्र सायंकाळी सहाच्या सुमारास धो धो पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सुट्टीच्या दिवशी बाहेर निघालेल्या नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. पावसाने साधारण एक आठवडाभर उघडीप घेतली होती. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये पाऊस बरसत आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर धरणांमधून पाण्याच्या विसर्गास पुन्हा सुरुवात होणार आहे.

दरम्यान हा पाऊस उघड-झाप करीत ५ ते ७ दिवस कोसळण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या या जोरदार पावसाबरोबरच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या शहरांच्या सभोवतालच्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील भागावर तसेच डहाणू, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नवापूर, नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, रावेर, जामोद, धामणी, वरुड, नरखेड, सावनेर भाग व परिसरात तसेच गोंदिया, गडचिरोली, चांदा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज रात्रीपासुन पावसाचा जोर अधिक वाढण्याची व तो १३-१५ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता असल्याची माहिती निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या