Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअरेरे! मारहाणीनंतर बाळ गमावलेल्या हिराबाईंचा अस्वस्थ करणारा प्रवास

अरेरे! मारहाणीनंतर बाळ गमावलेल्या हिराबाईंचा अस्वस्थ करणारा प्रवास

पेठ | Peth

जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) पेठ तालुक्यातील (Peth Taluka) गांडोळे येथील हिराबाई कैलास गारे (Hirabai Gare) या महिलेस प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. या महिलेला सफाई कर्मचारी महिलेने मारहाण (Beaten) केल्यामुळे हिराबाई यांच्या बालकाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील भयावह प्रकार उघडकीस आला…

- Advertisement -

या घटनेची पूर्वाधही तितकीच धक्कादायक आहे. दैनिक देशदूतच्या पेठ वार्ताहराने केलेल्या सखोल वार्तांकनामध्ये हे वास्तव समोर आले आहे. त्याचे असे झाले, पेठ तालुक्यातील पंचायत समितीच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाच्या आंबे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Ambe PHC) कार्यकक्षेतील गांडोळे येथून हिराबाई यांना प्रसुतीकळा सुरु झाल्या.

त्यांचे पती कैलास यांनी खासगी गाडीने त्यांना रात्री ९ ते १० वाजेदरम्यान आंबे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. या केंद्रात कुठलीही तपासणी न करता ड्युटीवरील परिचारीकेने ८ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजेदरम्यान आशा सेविकेसोबत दांम्पत्यास त्याच खासगी गाडीने पेठ ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

पेठ ग्रामीण रुग्णालयातदेखील (Peth Rural Hospital) कुठलेही उपचार न करताच बीपी १६४/१०८ असा असत्याचा अहवाल नोंदवून त्यांना खासगी वाहनानेच रात्री ३, ४ वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वरील प्रकार घडला.

गर्भवतीस मारहाण करणारी सफाई कामगार महिला निलंबित

हिराबाई यांना नेमके कोणत्या कारणासाठी आंबे ते पेठ व तेथून नाशिक असा जिवघेणा प्रवास करावा लागला याचे कारण गुलदस्त्यातच आहे. मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आढावा बैठकीत नागरिकांच्या आरोग्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. मात्र काही दिवसांच्या अवधीतच या मातेस आरोग्य व्यवस्थेच्या अनागोंदी कारभाराने आपले बालक गमावावे लागल्याने आरोग्य यंत्रणेतील अनास्था स्पष्ट झाली आहे.

आंबे प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८, १०२ सुविधा देणाऱ्या रुग्णवाहीका नादुरुस्त असल्याने गारे कुटुंबीयांना खासगी वाहनाचा आसरा घेणे भाग पडले. दोन्ही आरोग्य केंद्रात कुठलीही तपासणी अथवा उपचार करण्यात आले नाही.

– कैलास गारे, हिराबाई यांचे पती

- Advertisment -

ताज्या बातम्या