Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना फुटीवरील 'सर्वोच्च' सुनावणी लांबणीवर?

शिवसेना फुटीवरील ‘सर्वोच्च’ सुनावणी लांबणीवर?

नवी दिल्ली | New Delhi

शिवसेना नेते (Shiv Sena leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी (MLA) केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून (Shinde Group) तेच शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. हा सगळा वाद आता सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात उद्या (८ ऑगस्ट) होणारी सुनावणी काही दिवस पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या एका गटाने भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना (Shivsena) ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अचानक झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Justice Krishna Murari) व न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Hima Kohli) यांचा समावेश असलेल्या पीठासमोर या शिवसेना वादासंबंधित सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत तीन वेळा सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ८ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती. मात्र, आता ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता असून पुढील सुनावणी १२ ऑगस्टला होणार असल्याचे बोलले जात आहे. तर ८ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा १७ क्रमांकाच्या पीठा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही न्यायमूर्ती या पीठासमोरील याचिकांची सुनावणी घेणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या