Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांना दिलासा नाहीच; पुढील सुनावणी 'या' तारखेला

संजय राऊतांना दिलासा नाहीच; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

मुंबई | Mumbai

गोरेगाव येथील पत्राचाळ आर्थिक घोटाळा (Patra Chawal Scam) प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड कारागृहातील (Arthur Road Jail) मुक्काम वाढला आहे…

- Advertisement -

न्यायालयाने राऊत यांच्या जामीन अर्जावरील (Bail Application) सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही राऊत उपस्थित राहू शकणार नाहीत.

राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने (ED) जून महिन्यात अटक (Arrested) केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर जामीन मिळावा या करता राऊतांनी न्यायालयाकडे (Court) अर्ज केला होता.

दरम्यान, या अर्जावरील सुनावणीसाठी राऊतांना आज पीएमएलए न्यायालयात (PMLA Court) हजर करण्यात आले असता ईडीने युक्तिवाद करण्यासाठी पुढची तारीख मागितली. त्यानुसार न्यायालयाने आता १० ऑक्टोंबरपर्यंत सुनावणी (Hearing) पुढे ढकलली असून राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या