ऋतुजा लटकेंच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी

उच्च न्यायालय
उच्च न्यायालय

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे (ShivSena) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे...

या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अद्यापही बीएमसीने (BMC) मंजूर केला नसल्याने त्यांना उमेदवारी फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला असला तरी बीएमसीने अद्यापही त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com