Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज नेमकं काय घडलं?

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाची (MLA Disqualification Case) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी झाली. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर जवळपास अडीच ते तीन तास तिसरी सुनावणी सह्याद्री येथे पार पडली. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी प्रत्येक आमदाराची सुनावणी एकत्रितपणे घ्यावी, अशी मागणी केली. तर ठाकरे गटाच्या वकिलांनी या मागणी जोरदार विरोध केला. यानंतर आता आमदार अपात्रतेसंदर्भात स्वतंत्र सुनावणी होईल की एकत्रित सुनावणी होईल, याबाबतचा निकाल २० ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष देण्याची शक्यता आहे...

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज नेमकं काय घडलं?
Dasara Melava : "एक पक्ष, एक नेता..."; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून टिझर प्रदर्शित

ठाकरे गटाने तीन अर्ज दाखल केले होते त्या अर्जावर आज सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या २० (एकूण ४० पैकी) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सर्व १४ आमदारांसह दोन प्रतिस्पर्धी गटांतील ३४ आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिका प्रलंबित आहेत.

त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तसेच ठाकरे गटातील प्रत्येक वकिलांकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली. याउलट शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाच्या वकिलांकडून याचिकांमधील मुद्द्यांची मांडणी करण्यात आली. यानंतर आजची सुनावणी संपल्यानंतर दोन्ही गटांनी माध्यमांशी संवाद साधला.

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : "छगन भुजबळांना फक्त मंत्रिपद हवं होतं म्हणून ते..."; 'त्या' विधानावरून संजय राऊतांचा निशाणा

यावेळी बोलतांना शिंदेंच्या शिवसेनेचे वकील म्हणाले की, आज अडीच ते तीन तास दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाला. आता यावर २० तारखेला निर्णय देण्यात येणार आहेत. तसेच, ठाकरे गटाकडून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी (Hearing) घेण्याची मागणी केली गेली. परंतु, या सर्व याचिकांमध्ये (Petition) वेगवेगळे मुद्दे आहेत. वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे या सर्व याचिका एकत्र करून त्यावर सुनावणी घेणे कायद्याने योग्य नाही, असा आमच्याकडून युक्तीवाद करण्यात आला आहे", असे त्यांनी सांगितले.

तसेच बैठकींना हजर न राहणे, अध्यक्ष निवडीचा व्हीप न पाळणे, बहुमत सिद्ध करताना व्हीप न पाळणे या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे, त्या प्रत्येक आमदाराला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. या सर्व याचिका एकत्र केल्यास तो अधिकार राहणार नाही. त्यामुळे अध्यक्षांना आम्ही विनंती केली आहे की लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील", असेही शिंदे गटाचे वकील म्हणाले.

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज नेमकं काय घडलं?
Sharad Pawar : "अजित पवार मुख्यमंत्री होतील पण..."; शरद पवारांचा दादांना चिमटा, भुजबळांवरही साधला निशाणा

तर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले की, कायद्याचा किस पाडून वेळ काढला जात आहे. प्रत्येक आमदाराची (MLA) सुनावणी स्वतंत्र करणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे वेळकाढूपणा सुरू असल्याचे दिसत आहे. न्यायाला उशीर हा अन्याय केल्यासारखं आहे. सर्वोच्च न्यायालयातून न्याय मागावा की अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष लवकर निर्णय देतील नाही तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मागणी करावी लागेल, असे देसाई यांनी सांगितले.

तर ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्ष यांनी आज सुनावणी घेतली. आमचे वकील देवदत्त कामत यांनी एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी केली. पंरतु, शिंदे गटाने वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी लोकशाहीला धरून निर्णय द्यायला हवा अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज नेमकं काय घडलं?
Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com