संजय राऊतांना जेल की बेल?; आज होणार फैसला

संजय राऊतांना जेल की बेल?; आज होणार फैसला

मुंबई | Mumbai

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीने (ED) १ ऑगस्टला अटक (Arrested) केली. आज त्यांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) संपणार आहे. त्यामुळे शिवसैनिक आणि राऊत समर्थकांचे लक्ष आजच्या न्यायालयीन सुनावणीकडे लागले आहे.

सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात संजय राऊतांचा मुक्काम आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांची 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.

कोठडी संपत असल्याने राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार की कोठडी याचा निर्णय आज होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com