तारीख पे तारीख! राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

तारीख पे तारीख! राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली | New Delhi

महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, एम आर शहा, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी नरसिंहा या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली...

घटनापीठाने सुनावणीत याआधी निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेच्या (shivsena) पक्षचिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत का अशी विचारणा केली.

तसेच दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. यानंतर घटनापीठाने (Constitution Bench) २७ सप्टेंबरला या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय देऊ असे स्पष्ट केले. तसेच निवडणूक आयोगाला २७ सप्टेंबरपर्यंत या प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. त्यानंतर शिंदे गटाने (shinde group) आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. यानंतर न्यायालयाने ते प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले होते. त्यावर आज सुनावणी झाली असता ती पुढे ढकलण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com