राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली | New Delhi

शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची?, धनुष्यबाण कुणाला मिळणार?, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, अशा विविध मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने सत्तासंघर्षावरील ही सुनावणी ४ आठवडे पुढे ढकलली आहे.

आज सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड (Justice Dr. Dhananjay Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून कागदपत्रांचा गोषवारा सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागण्यात आली.

दरम्यान, यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com