अयोध्येतील राम मंदिर पाडून...; नाशिक कोर्टात 'पीएफआय' संबंधित धक्कादायक खुलासा

अयोध्येतील राम मंदिर पाडून...; नाशिक कोर्टात 'पीएफआय' संबंधित धक्कादायक खुलासा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय (PFI) संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना देशविरोधी कारवाईच्या आरोपाखाली एटीएसने (ATS) ताब्यात घेतले आहे. या संघटनेसंबंधित धक्कादाक खुलासे आता सुनावणीदरम्यान (Hearing) पुढे येत आहेत...

एटीएसने (ATS) २२ सप्टेंबरला राज्यभर छापे मारुन पीएफआयशी (PFI) संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. यात मालेगावमधून एक, कोल्हापूरमधून एक, पुण्यातून दोन आणि बीडमधून एकाला ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना सोमवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

अयोध्येतील राम मंदिर पाडून...; नाशिक कोर्टात 'पीएफआय' संबंधित धक्कादायक खुलासा
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; सहा जणांचा मृत्यू

‘एटीएस’ने अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) पाच जणांकडून ‘हार्ड डिस्क’ जप्त करण्यात आली आहे. त्यातून 'पीएफआय'ला अयोध्येत उभारले जात असलेले राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारायची होती.

अयोध्येतील राम मंदिर पाडून...; नाशिक कोर्टात 'पीएफआय' संबंधित धक्कादायक खुलासा
मालेगावमधील 'या' भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; 'पाहा' व्हिडीओ...

२०४७ पर्यंत पीएफआयला भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी पक्षाने नाशिक कोर्टात ही माहिती दिली.

न्यायालयाने या संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, एटीएसने अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी राखून ठेवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com