Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यावृक्षतोडीबाबत याचिकेची आज सुनावणी

वृक्षतोडीबाबत याचिकेची आज सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील दोन उड्डाणपुलांच्या Proposed Flyover Construction नावाखाली 588 वृक्ष तोडण्याच्या Tree Cutting मनपाच्या प्रयत्नांना पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. तर आता या प्रस्तावाविरोधात उच्च न्यायालयात High Court अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Environment Minister Aditya Thackeray नाशिकमध्ये येऊन अडीचशे वर्षांच्या वटवृक्षाची पाहणी करणार आहेत. त्याच दिवशी उच्च न्यायालयात वृक्षतोडीबाबत याचिकेची सुनावणी होणार आहे. नाशिकमधील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्षप्रेमींनी ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत राज्य शासन, वनविभागाचे वनसंरक्षक, नाशिक मनपा, आयुक्त कैलास जाधव, वृक्ष प्राधिकरण समिती आणि या समितीचे सर्व सदस्य शहर अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. नाशिकमधील वृक्षतोडीसंदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यात कोणते वृक्ष तोडावे आणि कोणते तोडू नयेत याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. वृक्षतोडीची कार्यवाही देखील नमूद केले आहे.

असे असताना मनपाकडून मनमानी पद्धतीने शहरात वृक्षतोड सुरू आहे. हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी (दि 28) दुपारी बारा वाजता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार असून तशी नोटीस नाशिक मनपाला देण्यात आली आहे.

पर्यावरणमंत्र्यांचा आज पाहणी दौरा

नवीन नाशिक भागात होणार्‍या दोन नवीन उड्डाणपुलाचा कामात येणार्‍या शेकडो झाडांची कत्तल होणार असल्याचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष दिल्याने दोनशे वर्ष जुना वृक्ष वाचला आहे. मात्र इतर झाडांचे काय? याबाबत चर्चा सुरू आहे. यासाठी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी मनपाच्या तीन विभागांची समिती तयार करून सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार त्रिमूर्ती चौकापासून जाणार्‍या उड्डाण पुलाच्या कामात 94 झाडे येणार होती. मात्र ती संख्या आता 30 वर आली आहे.

यातील अनेक झाडे इतर ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार आहे. दरम्यान मायको सर्कल पासून जाणार्‍या उड्डाणपुलाच्या कामाच्या सर्व्हे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उद्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वतः नवीन नाशिक भागात पाहणी दौरा करून या संपुर्ण भागाची तसेच तोडण्यात येणार वृक्षांची माहिती घेणार आहे. नवीन नाशिक भागात होणार्‍या दोन्ही उड्डाणपुलाच्या कामात येणार्‍या अडचणी दूर करण्यात येतील. जास्त हानी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच याबाबत सखोल अभ्यास करून विकास कामे होणार आहे, असा दावा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केला आहे.

दरम्यान कमीत कमी झाड तोडण्यात येईल, कामात येणार्‍या झाडांची संख्या तसेच त्याचे इतर ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार आहे. ज्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येऊ शकत नाही त्या संख्येने नवीन झाडे लावण्यात येणार आहे, भविष्यात निओ मेट्रोचा मार्ग देखील येथून जाणार आहे. पुढे या भागात डबल सर्वे करावा लागणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या