Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याप्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक एसीबीच्या जाळयात

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक एसीबीच्या जाळयात

नाशिक | प्रतिनिधी

लासलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचून रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की तक्रारदार दिलेल्या तक्रारी नुसार लासलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक बळीराम शेंडगे यांनी आपल्या पदाचा उपयोग करून तक्रारदार यांच्या पत्नीची संतती नियमन शस्त्रक्रिया उप जिल्हा रुग्णालय, निफाड येथे करून दिल्याचे मोबदल्यात स्वत:साठी रुपये 1000/- ची मागणी करून ती स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, यांच्या मार्गदर्शना खाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे; पोलीस निरीक्षक साधना बेळगांवकर, ; पोलीस हवलदार एकनाथ बाविस्कर, प्रफुल्ल माळी,विनोद पवार,यांनी कारवाई केली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक

0253- 2575628.

0253- 2578230.

@ टोल फ्रि क्रं. 1064

- Advertisment -

ताज्या बातम्या