Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआरोग्य मंत्र्यांचा दौरा अंधारातून

आरोग्य मंत्र्यांचा दौरा अंधारातून

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला NMC electrical department राज्यमंत्र्यांची जणू काही भीतीच उरली नाही अशी परिस्थिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे State Health Minister Rajesh Tope यांच्या अंबड Ambad येथील दौऱ्याप्रसंगी बघायला मिळाली.

- Advertisement -

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अंबड औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी भेट दिली यावेळी प्रभाग क्रमांक 28 मधून माऊली लॉन्स दिशेने प्रणव स्टेम्पिंग कडे ना. टोपे यांच्या गाडीचा ताफा आला मात्र माऊली लॉन्स परिसर सोडून रस्त्यालगत असलेले सर्व पथदीप बंद अवस्थेत होते, त्यामुळे त्यांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागले.

मनपा विद्युत विभागाने राज्यमंत्री आपल्या परिसरामध्ये येत असताना परिसरातील पथदीप सुरू आहे की बंद आहेत ? याकडे बघणे गरजेचे होते मात्र विद्युत विभागाने या प्रकाराकडे डोळेझाक केल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

जणू काही मंत्र्यांची काही भीतीच अधिकाऱ्यांना उरली नाही अशी परिस्थिती याठिकाणी असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. जर राज्यमंत्र्यांसाठी अशी परिस्थिती असेल तर सर्व सामान्य नागरिकांचं काय असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या