Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबूस्टर डोस घ्यायचा की नाही? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान...

बूस्टर डोस घ्यायचा की नाही? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान…

नागपूर । Nagpur

देशात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या (corona patients) वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच भारतात कोरोनाचा नवा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट सापडला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच राज्यात करोना नियंत्रणात (corona control) असून लोकांना बूस्टर डोस (Booster dose) संदर्भात आग्रह नसल्याचे विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केले आहे…

- Advertisement -

आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope) आज नागपूर (Nagpur) दौऱ्यावर असून त्यानी नागपुरातील रवी भवन येथे पत्रकारांशी संवाद (press conference) साधला. यावेळी त्यांनी बूस्टर डोससंदर्भात (Booster dose) महत्वाचे विधान केले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील करोना नियंत्रणात आहे. तसेच लोकांना बूस्टर डोस संदर्भात आग्रह नाही. परंतु करोनाविरोधात लढणारे प्रतिपिंड (Antibody) तपासून तिसऱ्या डोससंदर्भात (Third Booster Dose) निर्णय घ्यावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच राजेश टोपेंनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील रिकव्हरी टक्केवारी (Recovery Percentage) ९८ टक्क्यांवर असून लसीकरणाचे (Vaccination) चांगले परिणाम दिसत आहेत. तसेच राज्यात रुग्ण कमी असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत काळजी करण्याची कुठलीही गरज नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या