इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राजेश टोपे म्हणाले…

नाशिक जिल्ह्यातील घोटी (Ghoti) येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी करोना लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

इंदुरीकर ( indurikar maharaj) यांनी कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) घेणार नाही, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावरून सोशल मिडिया ( social media ) वरती देखील त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope ) यांनी सांगितले आहे.

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

राजेश टोपे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी. इंदुरीकर महाराज यांच्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते. त्यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. लसीकरणाचे महत्त्व जगात सगळ्यांनी जाणलं आहे. इंदूरीकर महाराज यांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र, वैज्ञानिक बाजू त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *