बहुचर्चित आरोग्य विभागाची उद्या परीक्षा

बहुचर्चित आरोग्य विभागाची उद्या परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Public Health Department) आरोग्य सेवेतील गट बहुचर्चित 'क' संवर्गाची लेखी परीक्षा (Exams) आज रविवारी दि. २४ रोजी होत आहे. तर गट-ड साठी पुढील रविवारी दि. ३१ रोजी परीक्षा होणार आहे . अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ (Dr. P.D. Gandal) यांनी दिली....

नाशिक परिमंडळात गट 'क' मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. नाशिक, जळगाव, नगर जिल्ह्यातील एकूण १४२ केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था केली आहे.

नाशिक जिल्ह्यात प्रथम सत्रात १८ हजार ८७, द्वितीय सत्रात १८ हजार १८३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. जळगाव जिल्ह्यात द्वितीय सत्रात १४ हजार ७४८, तर नगर जिल्ह्यात द्वितीय सत्रात १७ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क व गड-ड सर्व रिक्त पदे भरण्यात येत आहे. यासाठी घेण्यात येणारी परीक्षा विविध कारणामुळे यापूर्वी दोनदा रद्द करण्यात आलेली होती.

आरोग्य विभागाच्या वतीने भरती प्रक्रियेत गट-क संवर्गाचे २ हजार ७३९ व गट-ड संवर्गाचे ३ हजार ४६६ पदे असे एकूण ६ हजार २०५ पदे भरली जाणार आहे. आरोग्य विभागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात परीक्षार्थींनी अर्ज केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com