Photo आरोग्य विभाग भरती परीक्षा : गोंधळामुळे दबाब होता, पण पेपर सोपा गेला

Photo आरोग्य विभाग भरती परीक्षा : गोंधळामुळे दबाब होता, पण पेपर सोपा गेला
Published on
1 min read

गेल्या काही दिवसांपासून अकार्यक्षम व्यवस्थापन आणि तांत्रिक गोंधळामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आरोग्य विभागाची (health department)परीक्षा (exam)रविवारी नाशिकमध्ये (nashik)सुरळीत झाली. यामुळे विद्यार्थ्यांनी (student)सुटकेचा नि:श्वास सोडला. गोंधळामुळे परीक्षेचा दबाव होताच, परंतु पेपर सोपा गेला, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

आज राज्यभरात आरोग्य विभागाची गट ड वर्गासाठी परीक्षा पार पडत आहे. 3464 पदांसाठी राज्यभरात 1364 परीक्षा घेण्यात येईल.

दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. यापूर्वीचा अनुभव पाहता निदान आजतरी परीक्षा सुरळीत पार पडणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु नाशिकमधील सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत झाली. कुठेही गोंधळ झाल्याचे वृत्त नाही.

यापुर्वी झाला होता गोंधळ

गट क वर्गाच्या पेपरवेळी तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी नाशिकमधील केटीएचएम (kthm) महाविद्यालय व गिरणारे येथील केंद्रात सावळा गोंधळ झाला होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगळ्याच कोडचे पेपर दिले गेले. हा प्रकार पेपर झाल्याच्या तासाभरानंतर लक्षात आला. या परीक्षेत अपेक्षित विषयसोडून दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप परिक्षार्थीं केला आहे.

बऱ्याच गोंधळानंतर परीक्षा होत होती त्याचा दबाव होता , पण पेपर सोपा गेला.आता लवकर निकाल लागण्याची प्रतिक्षा राहील.

रितेश धुमाळ (परीक्षार्थी, औरंगाबाद वरून आलेला)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com