Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्य विभागाची परीक्षा आता या तारखेला, राजेश टोपे यांनी दिली माहिती

आरोग्य विभागाची परीक्षा आता या तारखेला, राजेश टोपे यांनी दिली माहिती

आरोग्य विभागातील (health department)गट क आणि गट ड प्रवर्गातील परीक्षा (examination)अचानक स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये (october)होणार आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनीऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती दिली. परीक्षा १५-१६ किंवा २२-२३ ऑक्टोबर घेतली जाईल, असे त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे.

धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

- Advertisement -

परीक्षा केवळ पुढे ढकलल्या आहेत. आयटी कंपनीच्या गोंधळाने काही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते. न्यासा कंपनीची असमर्थता हे त्यामागचे कारण होते.राज्यात २५ सप्टेंबरआणि २६ सप्टेंबर आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. गोंधळी कारभारामुळे परीक्षा चर्चेत आली होती. भरती परीक्षा महाराष्ट्रात होत आहे, मात्र काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर इतर राज्यांतील परीक्षा केंद्रांची नावं आली आहेत.

या चुकीबद्दलही टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. ‘एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा आलं. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला होता. पण ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे’, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या