Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादर्जेदार आरोग्य सुविधांसाठी केंद्र, राज्य युती आवश्यक : डॉ. भारती पवार

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी केंद्र, राज्य युती आवश्यक : डॉ. भारती पवार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा रुग्णालय (Civil Hospital) नाशिक येथे आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने करण्यात आले….

- Advertisement -

यावेळी डॉ. पवार यांनी आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत (azadi ka amrut mahotsav) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील जनतेस दर्जेदार आरोग्य सुविधा (Health facilities) पुरविण्यासाठी तसेच हेल्थ आय.डी., PMJAY कार्ड तयार करणे, औषधोपचार तथा शस्त्रक्रिया मोफत करून लाभ करून घ्यावा.

सामान्य माणसाला लाभ करून देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार कटीबद्ध आहेत, असे वक्तव्य करत शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ही सर्व हेल्थ कॅम्पसाठी (Health Camp) शुभेच्छा संदेश दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आजपासून सुरु झालेले हे शिबिर २२ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. पंधरा तालुक्यामध्ये शिबिरांचे आयोजन केले असून यात क्षयरोगापासून ते कॅन्सरपर्यंत (Cancer) सर्वच आजारांचे निराकरण होणार आहे. शहरात जिल्हा रुग्णालय येथे तर तालुक्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय तालुक्याच्या मुख्यालय येथे हे शिबिर असणार आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हयाचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक डॉ. रघुनाथ डी. भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर तथा नाविन्यपूर्ण संकल्पनेतून रुग्णांव्दारे दिप प्रज्वलन तथा धन्वंतरी पूजन करण्यांत आले. प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नाशिक जिल्हयावर विशेष लक्ष असल्याने डॉ. भारती पवार यांचे आभार मानले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी तालुका स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. शरद पाटील हे नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि त्र्यंबक यांचे नोडल अधिकारी असतील. डॉ. लक्ष्मण चव्हाण हे मालेगाव सटाणासाठी नोडल अधिकारी असतील तर उर्वरित ९ तालुक्यांसाठी डॉ. राठोड आणि डॉ. अनंत पवार हे नोडल अधिकारी असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या