Saturday, April 27, 2024
Homeधुळेलेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?

लेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

समाजात गेल्या काही वर्षांपासून विवाहातील (marriage) नविन चालीरीतींना आळा घालून त्या नविन चालीरितींसोबत काही जुन्या चालीरिती देखील बंद करण्यासाठी लेवा गुजर समाजाची (Lewa Gujar community) बैठक घेण्यात आली.

- Advertisement -

अ‍ॅड. चव्हाणांच्या पोलीस कोठडीसाठी पुनर्विलोकन अर्ज

लेवा गुजर समाजाच्या विविधमंचाद्वारे या वाईट व खर्चिक प्रथा बंद करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येते. त्याच अनुषंगाने समाजातील सर्व घटकाकडून विविध विषयांवर चर्चा करून एकमताने या चालीरीती बंद करण्याचा ठराव करण्यात आला.

रिंग सेरिमनी बंद करणे, प्रिवेडिंग शुटींग बंद, मेहंदी सेरिमनी बंद करणे, बँड रात्री 12 वाजेपावेतो, गरब्याच्या रात्री नवरदेव किंवा नवरी एक दुसर्‍यांकडे गरबे खेळायला जाणे बंद करणे, नवरदेव आणण्यासाठी फक्त घोडा आणणे, रथ, बग्गी बंद करणे, गरब्याच्या कार्यक्रमाच्या सायंकाळी जेवण फक्त पाहुणे मंडळींसाठी, फोटोग्राफी मर्यादित करणे, फोटोग्राफर यांना वेळ वाचविण्यासाठी प्रवृत्त करणे, ब्युटीपार्लर फक्त नवरी पुरतेच मर्यादित ठेवणे म्हणजे बाकी पॅकेज बंद, शक्य असल्यास घरगुती वस्तू देणे आणि लाडू फक्त 5 किलो देणे, नवरी मुलीस किचन सेट देणे बंद करणे, व्याही-व्याहीनी बोलविण्यासाठी फक्त 10 लोक जातील आणि येतील, लग्नात पाकीटांच्या व्यवहारासोबत गावातील व्यवहार बंद करणे, फक्त जवळीक यांचे कडूनच हळदीच्या दिवशी 10 रुपये घेणे, व्याहीनींची पैठणी देणे बंद करणे, लग्न वेळेवरच मुहूर्तावर लावणे, जेवण गावातील तरुणच वाढतील अशा विविध विषयांवर चर्चा करून एकमताने विविध चालीरीती बंद करण्याचा ठराव करण्यात आला.

बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरलीबारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

सरपंच भारतीबेन पटेल यांनी महिलांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतले व मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे महिलांचेही या आदर्श लग्न संहिता व समाजातील नियम काटेकोरपणे पाळण्याविषयी एकमत झाले.

प्रा. विजयभाई चौधरी यांनी प्रस्तावना करताना समजातील अनिष्ठ प्रथा या वाढत चालल्या आहेत. त्यांना कुठे तरी आला बसावा यासाठी बैठक घेण्यात आली. तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे त्यांनी सामुहिक लग्न समारंभात नाव नोंदवून लग्नसमारंभ पार पाडावा, म्हणजे आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार नाही असे मत व्यक्त केले.

प्रा. विनोदभाई पटेल यांनी सर्वसाधारणपणे लग्नात किती खर्च लागतो याचा अंदाजे जमा खर्च मांडून दाखवला व तो खर्च नियंत्रित करून उरलेला पैसा आपल्याच मुलांसाठी राखून ठेवला. शिक्षणावर किंवा भविष्यात नोकरी मिळाली नाही तर व्यवसायासाठी कामास येईल असे सांगितले.

Makeup Part 6 : न्यू जनरेशन कॉस्मेटिक्सतांदलवाडीत वैद्यकीय व्यावसायिकाने घेतले चार एकरांत 93 टन टरबुुजाचे उत्पादन

याप्रसंगी शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन दिलीपभाई पटेल यांनी मार्गदर्शन केले. माजी मुख्याध्यापक दगडू गोरख पाटील यांनी या आदर्श लग्न संहिता पाळण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवावा, पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाही करावी असे मत व्यक्त केले. दंडाची रक्कम धार्मिक व सामाजिक कार्यासाठी वापरण्यात यावी असा आग्रह केला.

या आदर्श लग्न संहितांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस पाटील संजयभाई चौधरी यांनी केले.

मोहिदा शिवारात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

- Advertisment -

ताज्या बातम्या