हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का; काय आहे प्रकरण ?

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Former minister Hasan Mushrif) यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. न्यायालयाने आज त्यांना धक्का दिला.

हसन मुश्रीफ यांच्या ईडी कारवाई मधील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, यामुळे त्यांच्या धावपळीत आता वाढ झाली आहे.

सत्र न्यायालयाच्या या निकालानंतर आता माजी मंत्री हसन मुश्रीफ उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता असून त्यांना त्यांच्या हालचाली गतिमान कराव्या लागणार आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे सध्या ईडी (ED) कारवाईच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली आहे.

हसन मुश्रीफ
आनंदाची बातमी!, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्रं

या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते; पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्याऐवजी त्यांनी न्यायालयाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं गेले. या सगळ्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन (Anticipatory bail) अर्जाला सत्र न्यायालायाने नाकारत मोठा धक्का दिला आहे.

हसन मुश्रीफ
त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा न करताच...; शरद पवारांनी व्यक्त केलं मत
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com