Thursday, April 25, 2024
Homeक्रीडापाच कोटीच्या घड्याळावर हार्दिक पंड्या म्हणाला...

पाच कोटीच्या घड्याळावर हार्दिक पंड्या म्हणाला…

युएईमध्ये आयसीस टी२० विश्वचषक (t-20 word cup)स्पर्धेत भाग घेऊन भारतात परतणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्यावर (hardik pandya)सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली होती. रविवारी रात्री पंड्याच्या ताब्यातून दोन महागडी घड्याळे सापडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी पंड्याला मुंबई विमानतळावर थांबवले. दोन्ही मनगटाच्या घड्याळांची (watch) किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत होती. त्यानंतर आता हार्दिक पंड्याने (hardik pandya)स्वतः याबाबत खुलासा केला आहे.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

- Advertisement -

कस्टमच्या कारवाईहबद्दल हार्दिकनं (hardik pandya) ट्विट करून स्पष्टीकरण दिलं. ‘१५ नोव्हेंबरला सकाळी दुहईहून मुंबईला पोहोचल्यावर दुबईहून आणलेल्या सामानाची कस्टम ड्युटी भरण्यासाठी मी स्वत: विमानतळावर असलेल्या कस्टमच्या काऊंटरवर गेलो होतो. माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जात आहे. दुबईहून आणलेल्या वस्तूंची माहिती मी विमानतळावर हजर असलेल्या कस्टमच्या कर्मचाऱ्यांना दिली. मी दुबईमधून माझ्यासोबत आणलेले सर्व सामान मी घोषित केले. मी जे कायदेशीर दुबईमधून विकत घेतले होते आणि त्या वस्तूंवर जे काही शुल्क आकारले जाईल ते भरण्यास सहमती दर्शविली. सीमाशुल्क विभागाने मला वस्तू खरेदी करण्यासाठी कागदपत्रे मागितली आणि ती सादर करण्यात आली. या वस्तूंच्या शुल्काचे मूल्यमापन सीमाशुल्क विभाग करत असून, जे काही शुल्क असेल ते मी भरेन, असे मी आधीच सांगितले आहे. त्या घड्याळांची किंमत पाच कोटी नव्हे तर दीड कोटी आहे’ असं हार्दिकनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या