Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशविमानप्रवास करत आहात?; होऊ शकते 'नो फ्लाय'ची कारवाई

विमानप्रवास करत आहात?; होऊ शकते ‘नो फ्लाय’ची कारवाई

नवी दिल्ली | प्रतिनिधी

देशभरात पुन्हा एकदा करोनाने थैमान घातले आहे. मात्र, यावेळी कुठल्याही विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली नसल्याने असंख्य प्रवासी दररोज विमानसेवेच्या माध्यमातून या देशातून त्या देशात भ्रमंती करताना दिसून येत आहेत…

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर सर्वच विमानतळांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी प्रवाशांसाठी करोना नियमावली जाहीर करण्यात आली असून नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर थेट ‘नो फ्लाय’मध्ये टाकण्यात येणार आहेत.

याबाबत कठोर कारवाईचे संकेत केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले आहेत.

नुकतेच त्यांनी विमानतळ प्रशासनाला अधोरेखित करत निर्देश दिले आहेत.

सध्या संपूर्ण देश कोविड १९ च्या विरोधात लढाई करत असून लवकरच ती जिंकणार आहोत. मात्र, अजूनही काही नागरीक कोविड १९ साठी ठरवून दिलेले नियम पाळताना दिसून येत नाहीत. त्यामुळे रिस्क टाळण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर आता नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याचे काम करण्यात येत आहे.

पुढे पुरी म्हणाले की, सध्या विमानसेवेच्या माध्यमातून अनेक प्रवासी सध्या भ्रमंती करत आहेत. बस आणि ट्रेनच्या प्रवासापेक्षा हा प्रवास अधिक सुरक्षित असून प्रवाशांनी नियम पाळणे बंधनकारक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या