Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याक्रिकेटर, उद्योगपती ते आयआयटीचे प्राध्यापक... AAP कडून राज्यसभेसाठी 'या' पाच जणांच्या नावांवर...

क्रिकेटर, उद्योगपती ते आयआयटीचे प्राध्यापक… AAP कडून राज्यसभेसाठी ‘या’ पाच जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब

दिल्ली | Delhi

पंजाब विधानसभा निवडणुकीत(Punjab Assembly elections) प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर आम आदमी पार्टीने (AAP) राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Elections) तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

पंजाबमधून राज्यसभेच्या ५ जागांच्या नामांकनासाठी सोमवार हा अंतिम दिवस आहे.

या जागांवर क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh), आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक (Sandeep Pathak), पंजाबचे आपचे सह-प्रभारी राघव चढ्ढा (Raghav Chadha), लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल (Ashok Mittal) आणि कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांच्या नावाची घोषणा केली आहे.

हरभजन सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या राजकारणात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

तर, पंजाब विधानसभेत मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू होती.

संदीप पाठक यांना आपचे चाणक्य म्हणून ओळखले जाते. पंजाबमध्ये पक्षाच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या