हर घर तिरंगा उप्रकम : नाशिक विभागात ‘इतक्या’ राष्ट्रध्वजांचे वितरण

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम ( Har Ghar Tiranga Campaign) राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागातील शहरी व ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या 36 लाख 46 हजार 363 इतकी असून या प्रत्येक घरांवर तिरंगा फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात 36 लाख 04 हजार 994 इतके राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी 10 लाख राष्ट्रध्वजांचे वितरण

महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात 4 लाख 25 हजार 240 घरांची संख्या असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 5 लाख 74 हजार 760 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 7 लाख राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 3 लाख राष्ट्रध्वज पुरविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक महानगरपालिकेला 2 लाख तर मालेगाव महानगरपालिकेला 1 लाख राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 9 लाख 577 राष्ट्रध्वजांचे वितरण

अहमदनगर महानगरपालिका व अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 96 हजार 905 असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 02 हजार 761 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 7 लाख 80 हजार 577 राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 19 हजार 89 लाख राष्ट्रध्वज पुरविण्याची मागणी होती. परंतू 1 लाख 20 हजार राष्ट्रध्वज पुरविण्यात आले आहेत. यामध्ये महानगरपालिकेला 52 हजार तर नगरपालिकेसाठी 68 हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात 9 लाख 40 हजार 727 राष्ट्रध्वजांचे वितरण

जळगाव महानगरपालिका व जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 2 लाख 85 हजार 235 असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 6 लाख 80 हजार 156 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 7 लाख 65 हजार 727 राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 99 हजार 664 लाख राष्ट्रध्वजापैकी 1 लाख 75 हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत आहेत.

धुळे जिल्ह्यात 3 लाख 83 हजार 503 राष्ट्रध्वजांचे वितरण

धुळे महानगरपालिका व धुळे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 8 हजार 914 असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 2 लाख 93 हजार 205 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 2 लाख 73 हजार 503 राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 28 हजार 616 लाख राष्ट्रध्वजापैकी 1 लाख 10 हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात 3 लाख 80 हजार 187 राष्ट्रध्वजांचे वितरण

नंदूरबार नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 46 हजार 284 असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 3 लाख 32 हजार 903 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 3 लाख 60 हजार 187 राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 19 हजार राष्ट्रध्वज पुरविण्याची मागणी होती. 20 हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

24 तास फडकणार तिरंगा

भारतीय ध्वजसंहितेमध्ये 30 डिसेंबर, 2021 च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलीस्टर व यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले राष्ट्रध्वज घरावर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सदर अभियानामध्ये घरावर राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र 24 तास फडकविण्यात येणार आहे. हे अभियान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विभागात यथोचितपणे राबविण्यात येणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *