
मुंबई | Mumbai
तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) मोठा दिलासा दिला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Special Court) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल १२ दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे.
राणा दांपत्यांनी पून्हा अशाप्रकारे कायदा हातात घेऊ नये. माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, पोलिस ठाण्यात हजेरी लावावी अशा काही अटी न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत, असे केल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी २३ एप्रिलला त्यांच्या खार येथील निवासस्थानातून अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, राणा दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं होतं.