
मुंबई | Mumbai
विधानसभा (Assembly) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दूध भेसळीच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे साम्राज्य पसरले असून, लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार राज्यात सुरु आहे.
या प्रश्नावर विधानसभा विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition) आक्रमक झाले असून त्यांनी सभागृहात याकडे लक्ष वेधले आहे. दूध भेसळ (adulterated milk) करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद कायद्यात करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. मात्र राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही, याकडे पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.
दरम्यान, दुधातील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील. त्यानुसार 'आरे'तील कर्मचारी वर्ग हा अन्न आणि औषध प्रशासनाकडे वळवून दूध भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
तसेच नजीकच्या काळात दूध भेसळ रोखण्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात येईल. जेणेकरुन या हेल्पलाईनवर ग्राहकांना दूध भेसळीबाबत तक्रार करता येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.