Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याएचएएल कंपनीला मिळाली 'इतके' लढाऊ विमान बनवण्याची मान्यता

एचएएल कंपनीला मिळाली ‘इतके’ लढाऊ विमान बनवण्याची मान्यता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओझर (ozar) येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीला (Hindustan Aeronautics Company) (HAL) विमाने बनविण्यापोटी अधिकचे काम मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

- Advertisement -

देशालगतच्या सीमा सुरक्षित असाव्यात यासाठी वायूदलात (air force) भरती होणार्‍या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी -40 (HTT-40) जातीचे विशेष ट्रेनर विमाने (Trainer aircraft) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने (central government) घेतला आहे. खा.गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे एचटीटी-40 जातीचे 70 विमाने तयार करण्याचे काम ओझर (ozar) येथील एचएएल कंपनीला मिळाले असून, यासाठी 6 हजार 800 कोटी रुपयांच्या निधीला (fund) मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे 3 हजार अधिकारी, कर्मचार्‍यांना काम मिळणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. वायूदलात भरती (Air Force Recruitment) होणार्‍या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी-40 जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएलला (HAL) देण्याचे निर्णय सरंक्षण विभागाने घेतला असून त्यापैकी सुरुवातीला दहा विमानांची निर्मिती बंगळूरू (Bangalore) येथील एचएएलमध्ये तर उर्वरित साठ विमानांची निर्मिती ओझर एलएएलमध्ये करण्यात येणार आहे.

यासाठी सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. वायूदलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना एचटीटी-40 जातीचे ट्रेनर विमानाद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या विमानाचे ताशी स्पीड चारशे किलोमीटर असणार असून, विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. सदर विमान पुर्णतः भारतीय बनावटीचे असणार आहे.

एचटीटी-40 जातीचे विमाने तयार करण्याच्या कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे. मध्यंतरी संरक्षण विभागाचे सेक्रेटरी अजय कुमार यांची खा.गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सेक्रेटरी संजय कुटे, गिरीश पाटील, प्रशांत आहेर, नितीन पाटील आदींनी दिल्ली येथे भेट घेऊन परिस्थितीतची जारीव करुन दिली होती. एचएएल कारखान्याला विमान निर्मितीची ऑर्डर देण्याचे साकडे यावेळी खा.गोडसे यांनी अजयकुमार यांना घातले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या