ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी उद्या होणार; आज काय झालं कोर्टात?

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी उद्या होणार; आज काय झालं कोर्टात?

दिल्ली । Delhi

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत (Gyanvapi mosque survey) आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाला आज कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी होणार नसून शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही सुनावणी होणार आहे.

आज या खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांचे सहकारी ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची उद्या सुनावणी करावी. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुपारी ३ वाजता पुढील सुनावणीची वेळ निश्चित केली आहे.

यासोबतच वाराणसी न्यायालयातील सुनावणीलाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com