Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपोलिसांची मोठी कारवाई; एक कोटींचा गुटखा जप्त

पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटींचा गुटखा जप्त

देवळा | प्रतिनिधी | Deola

तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Agra National Highway) चिंचवे शिवारात स्थानिक गुन्हे शाखा (Crime Branch) व देवळा पोलिसांच्या संयुक्तिक कारवाईत तब्बल एक कोटी, सात लाख, ४६ हजार रुपयांचा गुटखा व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे…

- Advertisement -

याबाबत पोलिस (police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सागर शिंपी, पो. हवा. उदय पाठक, पो. हवा. प्रशांत पाटील, पो. ना. शरद मोगल, पो. ना. सुभाष चोपडा, पो. शि. योगेश कोळी व पो. शि. दत्ता माळी तसेच देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, विनय देवरे, ज्योती गोसावी, सचिन भामरे यांनी रात्री ११:३० वा. च्या सुमारास राहूड घाटाच्या पायथ्याशी चिंचवे शिवारात सापळा रचुन सदरचा गुटख्याची वाहतूक करणारा मोठा कंटेनर (क्र. RJ-14/GL- 6143) ताब्यात घेतला, त्यावळी कंटेनर चालकाने कंटेनरमधून उडी मारुन पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात

परंतू, पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन कंटेनर चालक सद्दाम शहजाद खान (Saddam Shahzad Khan) (रा. साहबनगर मथुरा उ. प्रदेश) यास ताब्यात घेतले. त्यावेळी कंटेनरमध्ये गुटख्याच्या एकूण १४७ मोठया थैल्या ठेवल्या असल्याचे दिसून आले. त्यावेळी सदर थैल्यांची बाजारभावाप्रमाणे एकूण किम्मत ८७ लाख, ४६ हजार, ३८० रु. एवढी असल्याचे पोलीसांनी सांगीतले.

नाशिकचे सायक्लिस्ट करणार चार दिवसात १२०० किमी प्रवास

दरम्यान, या प्रकरणात कंटेनरसह एक कोटीपेक्षा अधिक किमतीचा मुददेमाल जप्त केलेला आहे. याबाबत देवळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून, सदर गुन्हयाचा (Crime) पुढील तपास देवळा पोलिस ठाण्याचे (Devla Police Station) साहाय्यक पोलिस निरिक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.

तलावात बुडून तिघांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या