पेठजवळ मोठी कारवाई; ३८ लाखांचा गुटखा जप्त

पेठजवळ मोठी कारवाई; ३८ लाखांचा गुटखा जप्त

पेठ | Peth

गुजरातहून (Gujarat) पेठमार्गे नगरकडे जाणाऱ्या टाटा अल्ट्रा ट्रकमधून तब्बल ३८ लाख १९ हजार २०० रुपयांचा विमल पान मसाला (Vimal Pan Masala) व तंबाखूचा माल जप्त करण्यात आला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, जग्गी ट्रान्सपोर्टचा (Jaggi Transport) ट्रक गुजरातहून पेठमार्गे नगरकडे जात होता. संशयावरून पेठ पोलीस स्टेशन नजिकच्या पेट्रोल पंपाजवळ याची तपासणी केली असता ट्रक क्र. एम. एच. १६, सीसी २८४२ मध्ये साड्यांच्या मालाखाली महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेला विमल कंपनीच्या ६० गोण्या सापडल्या. प्रत्येक गोणीत २२ पुडे अशा एकूण १३ हजार २०० पुड्या पान मसाला व १३ हजार २०० पुड्या तंबाखू आढळून आली आहे.

मालाची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक संदीप देवरे (Sandeep Deore) यांनी मालाची तपासणी करुण प्रतिबंधित गुटखा असल्याची खातरजमा केली.

नंतर वाहन चालक सुभाष नारायण पालवे (Subhash Palve) (५७, रा . मु . पो . देवराई ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) व क्लिनर शिवाजी दामू कराड (Shivaji Karad) (४८ रा . एमआयडीसी, अहमदनगर) यांच्यासह वाहन मालक विनीत गिरीधर जग्गी यांना ताब्यात घेण्यात आले.

३८ लाख १९ हजार २०० रुपयांचा माल व १२ लाख रुपयांचे वाहन असा एकूण ५० लाख १९ हजार दोनशे रुपयांचे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. राधेश्याम गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वसावे अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com