Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवकील गुणरत्न सदावर्ते यांना बेल; 'इतक्या' दिवसांनी कारागृहाबाहेर

वकील गुणरत्न सदावर्ते यांना बेल; ‘इतक्या’ दिवसांनी कारागृहाबाहेर

मुंबई | Mumbai

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) अखेर १८ दिवसानंतर जेलमधून बाहेर पडले आहेत. यानंतर माध्यमांशी बोलताना आक्रमक पावित्रा त्यांनी कायम ठेवला. कारागृहाबाहेर सदावर्ते यांच्या स्वागतासाठी हार आणि पेढे कार्यकर्त्यांनी आणले होते. सदावर्ते म्हणाले की, ‘हम है हिदुस्थानी. हा विजय हिंदुस्थानींचा आहे…

- Advertisement -

पत्नी, मुलगी आणि मित्र परिवाराने साथ दिली. हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नसल्याचे सदावर्ते याप्रसंगी म्हणाले. राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करू असे ते म्हणाले.

आज वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai highcourt) दिलासा देत पुण्यात दाखल एफआयआरबाबत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. सदावर्ते यांनी आर्थर रोड जेलमध्ये उपोषण सुरु केल्याची माहिती कोर्टाला (Court) देण्यात आली होती.

त्यांनी अन्न न घेण्याचे ठरवले होते. पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapith police Station) वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांना सदावर्तेंचा ताबा हवा होता.

मात्र, त्यांना न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

त्यानंतर सदावर्ते यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विविध ठिकाणच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढलेला होता. अखेर आज त्यांना दिलासा मिळाला असून त्यांची तुरुंगातून सूटका झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या