सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी जामीन मंजूर

सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन (St Workers Agitation) केले. याप्रकरणात वकील गुणरत्न सदावर्तेंना (Gunaratna Sadavarte) अटक (Arrested) करण्यात आली होती...

आता सदावर्तेंना जमीन मंजूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने (Court) ५० हजारांच्या जात मुचकल्यावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सदावर्तेंना मुख्य संशयित तर इतर ११५ कर्मचाऱ्यांना सहसंशयित ठरवण्यात आले. या ११५ कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला आहे.

या कर्मचाऱ्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना पुन्हा कामावर रुजू होता येणार का? याबाबत अजून स्पष्टता नाही.

दरम्यान, सदावर्ते आता कोल्हापूर पोलिसांच्या (Kolhapur Police) कोठडीत आहेत. छत्रपतींचा अवमान केल्या प्रकरणी ते अटकेत आहेत. त्यामुळे सदावर्तेंना जमीन मिळाला असला तरी ते अजून बाहेर येऊ शकणार नाही.

Related Stories

No stories found.