
नाशिक | प्रतिनिधी Nashik
आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वकीलवाडीतील गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील एक पान स्टाॅल, एक मोबाईल दुकानाचे नुकसान झाले असून महागड्या दुचाकीदेखील झाडाखाली दाबल्या गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे....
सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ठिसूळ झालेले गुलमोहराचे झाड कोसळल्याने मोठा आवाज परिसरात झाला. सुदैवाने ह झाड रस्त्यावर न पडता शिल्पा डायनिंग हॉल या हॉटेलच्या नजीक असलेल्या मोबाईल दुकानावर कोसळले. यामुळे दुकानाचे नुकसान झाले, मात्र कुठलीही हानी झाली नाही.
या गल्लीत मोबाईलची दुकानेअसल्यामुळे याठिकाणी काही ग्राहक मोबाईल खरेदीसाठी आलेले होते. त्यांनी या दुकानांच्या बाहेर दुचाकी पार्क केलेल्या होत्या. या दुचाकीवरच या झाडाचे खोड पडल्यामुळे बुलेटसह इतर महागड्या तीन दुचाकींचे नुकसान झाले.
झाड्याच्या फांद्या आजूबाजूच्या दुकानांवर पडल्यामुळे या दुकानांचे बोर्डचे नुकसान होऊन ते कोसळले. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला प्राप्त होताच देवदूत जवानांसह घटनास्थळी दाखल झाली. यानंतर युद्धपातळीवर झाड बाजूला करण्यात आले. यानंतर झाडाची विल्हेवाट लावण्यात आली.
पावसाळा सुरु झाला असल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेनागरिकांनी पावसाची संततधार सुरु असल्यास वा वादळ सुरु सुरु असल्यास झाडाचा आडोसा घेणे टाळावे. झाडाखाली वाहने उभी करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.