गुजरात पूल दुर्घटना : मोदी जखमींना भेटायला जाणार, दौऱ्याआधी रातोरात रुग्णालयाची रंगरंगोटी... विरोधक संतापले!

गुजरात पूल दुर्घटना : मोदी जखमींना भेटायला जाणार, दौऱ्याआधी रातोरात रुग्णालयाची रंगरंगोटी... विरोधक संतापले!

मुंबई | Mumbai

गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवरील केबल पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी १४१ वर पोहोचली असून, अद्याप बचावकार्य सुरू आहे.

गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबीमध्ये मृतांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट घेणार आहेत.

परंतु, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. मोदी येणार असल्याने मोरबी रुग्णालयात भिंतींना टाईल्स आणि रंगरंगोटी करण्यात आली. यावरुन विरोधक मोदी आणि भाजप सरकारची कोंडी करताना दिसत आहेत.

काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी हा इव्हेंटबाजीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. तर आम आदमी पक्षाने हा फोटोशूटसाठी अट्टाहास सुरु असल्याचा आरोप करत टीका केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com