Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' याचिकेवर राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

‘त्या’ याचिकेवर राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

मुंबई | Mumbai

मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अंतरिम दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अंतरिम दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने (High Court of Gujarat) मंगळवारी नकार दिला. २०१९ च्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या राहुल गांधींच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे…

- Advertisement -

मोदी आडनाव प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविण्यास स्थगिती मागण्यात आली होती. याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत (Surat) येथील न्यायालयाने (Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्वही गमवावे लागले होते. यानंतर सुरत न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Sharad Pawar Resigns : उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट

त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.०२) रोजी राहुल गांधींना अंतरिम संरक्षण नाकारत उन्हाळी सुट्या संपल्यानंतर न्यायमूर्ती हेमंत प्रचारक (Justice Hemant Pracharak) निकाल देणार आहेत. एका न्यायाधीशाने या खटल्यातून स्वत:ला माघार घेतल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी नवीन न्यायाधीश करत आहेत.

अन् शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते झाले भावूक

प्रकरण काय आहे?

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर २३ मार्च रोजी सुरत कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला होता. न्यायालयाने राहुल गांधी यांना कलम ५०४ अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाने काही दिवसांचा अवधीही दिला होता. यासोबतच त्यांना तात्काळ जामीनही देण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत कोर्टात तीन याचिकाही दाखल केल्या होत्या, त्यापैकी एक कोर्टाने फेटाळली होती आणि दुसऱ्यावर ३ मे रोजी सुनावणी होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या