सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना

सत्र परीक्षा 12 जुलैपासून
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ( Savitribai Phule Pune University ) द्वितीय सत्रातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित आणि अनुशेेषित, तसेच बहि:स्थ श्रेणीसुधार परीक्षा 12 जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने (Online Examinations) ​टप्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्याwww.unipune.ac in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.

दरम्यान, विद्यापीठाची अंतिम परीक्षा सुरू होण्यापूर्वी परिक्षांची माहीती होण्याच्या दृष्टीने 8 ते 10जुलै या कालावधीत सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.

​ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी 60 प्रश्न असणार आहेत. त्यातील 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरली जातील.

विज्ञान, बीसीए (प्रथम वर्ष) व अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गणित व संख्याशास्त्र विषयांसाठी एकूण 30 प्रश्न विचारले जाणार असून त्यातील 25 प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. द्वितीय सत्र परीक्षेबाबतची मार्गदर्शक तत्त्वे व सूचना विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे नुकत्याच जाहीर केले आहेत.

तक्रारीत तथ्य असल्यास फेर नियोजन

लॉगीन न होणे / अचानक लॉगआऊट होणे व पुन्हा लॉगीन न करता येणे. इंग्रजी / मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसण चुकीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होणे.पेपर सबमिट न होणे. परीक्षेच्यावेळी कोविड विषाणूची बाधा, विद्यापीठ आयोजित दोन विषयांच्या परीक्षा े अथवा विद्यापीठ परीक्षा व सीईटी. सी. ए. सी.एस किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी येणे अशा तकारीत अर्जांची छाननी करुन सत्यता पडताळणी केली जाईल व त्यानंतर तकारीमध्ये तथ्य असलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे फेरआयोजन करण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे

​तांत्रिक अडचणीत सॉप्टवेअर मा़र्फत राहिलेला वेळ आपोआप वाढुन मिळेल.

​परीक्षेसाठीचा कालावधी दोन तासांचा असला तरी प्रत्यक्ष लॉगिंन केल्यावर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 1 तासाचीच वेळ असेल.

​परीक्षेबाबत विद्यार्थांना नोंदणीकृत एस. एम. एस.व ईमेलद्वार कळवण्यात यईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com