राज्य सरकारची गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, वाचा सविस्तर...

राज्य सरकारची गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, वाचा सविस्तर...

मुंबई :

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी (ganesh utsav)नवी नियमावली (guidelines)जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. वाचा काय आहे नियमावली...

राज्य सरकारची गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, वाचा सविस्तर...
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

काय आहे नियमावली?

 • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

 • कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका किंवा संबंधित प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असून घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

 • श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.

 • या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे, मुर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

 • उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

 • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.

 • लागू करण्यात आलेले निर्बंध वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कुठलीही शिथिलता देता येणार नाही.

 • आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणांसंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे

 • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाचा मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

 • दि.8 सप्टेंबर 2021 च्या शुद्धीपत्रकानुसार, गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे.

  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकानी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

  • महापालिका विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

  • कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com